amhiswavalmbi-healthiswealth.blogspot.com


                                                        https://aamhiswavlambhi.co.in/



https://aamhiswavlambhi.co.in/


स्वास्थ्याचा मोलाचा मंत्र

आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान (रजि) व ग्रंथ तुमच्या दारी मुंबई, विभाग आयोजित स्वाथ्य विषयक एक आगळा वेगळा कार्यक्रम २५० लोकांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ वेळ सायंकाळी ५ वाजता आनंद बँकेट हॉल अपना बाजार चारकोप येथे पार पडला,


वैद्यकीय सल्लागार,औषध तज्ज्ञ, संचालक फार्मा डॉ महेश अभ्यंकर आरोग्य साक्षरतेची साथीने वयाची शंभरी कशी पार करता येईल याचा मूलमंत्र सांगितला. शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक सबलता महत्त्वाची आहे. दर ५ वर्षाला प्रत्येकाने नवीन ध्येय जोपासावे व त्याला  बौद्धीक आणि  व्यावसायिक स्वाथ्याची जोड द्यावी. सामाजिक बांधिलकी जपत जीवनात अध्यात्मिक आनंद मिळावा असेही सांगितले. ‘इमोझील’ ह्या पुस्तकाचे दाखले देताना रोज काहीतरी वाचा हे सांगायला विसरले नाहीत.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अवकॉन  कंट्रोलस  कंपनीच्या संचालिका मनीषा दाभोलकर यांनी महिला उद्योजकतेचा आदर्श सर्वासमोर मांडला. सहयोगातून आणि नवकौशल्ये आत्मसात करून प्रगती करा असे सांगितले.


वीपीडी कंसलटंट  कंपनीचे संचालक विवेक माणगावकर यांनी सांगितले की उद्द्योजक बना. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा. अपयशाने खचून जाऊ नका किंवा यशाने हुरळून जाऊ नका तसेच कोणतेही काम छोटे नसते असा मोलाचा सल्ला दिला.  शून्यातून कसे उद्योगाचे विश्व निर्माण होऊ शकते हे स्वतःच्या उदाहरणे पटवून दिले. 


उपस्थित मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते १० वी च्या यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक तसेच ग्रंथ तुमच्या दारीचे कांदिवलीचे समन्वयक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती त्या प्रत्येकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


ग्रंथ तुमच्या दारी, कॅन्सर रुग्णांना मदत, रक्त दान शिबिरे, सैनिकास पत्र,  मुलांना पुस्तके वह्या वाटप, विविध स्पर्धा,  मराठी भाषा दिन, महिला दिन,  शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, बुद्धिबळ स्पर्धा,कोविड काळात अन्नदान आणि औषधे अशी 'आम्ही स्वावलंबी संस्थेच्या' १३ वर्षाच्या कार्याची घोडदौड संस्थेचे अध्यक्ष घनश्याम देटके यांनी मांडली.


कार्यक्रम संपन्न होण्यासाठी भाग्यश्री राऊ , संदीप पिसाळ, नारायण पवार, वैष्णवी पांचाळ, परिणीता माविनकुर्वे,संदीप जोशी ,नम्रता भोसले ,आकाश गोताड, दृष्ट्री परब,मयुरी गोताड,  रामभवन पाल ,गौरव सोमवंशी यांनी विशेष प्रयत्न केले

https://drive.google.com/drive/folders/1nLLIGqxHBaQhIKZJnQ7mZ4D_O_0LN6wN?usp=sharing





Comments